
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
खासदार सुनिल तटकरे,आमदार आदिती तटकरे यांच्या शिफाशीनुसार म्हसळा तालुक्यातील मौजे वारळ गावातील मोठ्या लोकवस्तीसाठी जळ जीवन मिशन योजने अंतर्गत १ कोटी २८ लक्ष रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली आहे.या योजनेचे पाईप लाईन खोदकाम मेंदडी वारळ हमरस्त्यालगत सुरू करण्यात आले आहे.योजनेच्या संपुर्ण कामाला वारळ गावाच्या ५० ते ६० ग्रामस्थांनी विरोध केला आहे.योजनेचे काम का करू नये या बाबत वारळ ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज मा.रायगड जिल्हा अधिकारी अलिबाग,अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग म्हसळा आणि योजनेचे ठेकेदार यांना सहिनिशी केला आहे.अर्जात मंजुर पाणी पुरवठा योजना हि सद्या स्थितीत पिण्यासाठी अस्वच्छ असलेल्या मेंदडी धरणाचे जलसाठया मधुन न करता ती खरसई धरणातून करण्यात यावी अशी प्रमुख व आग्रही मागणी करण्यात आली आहे तशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी खासदार सुनिल तटकरे व शासनाकडे केलेली आहे असे असतानाही शासस्तरावरून पाणी पुरवठा योजना मेंदडी धरणाचे उद्भवातुन जबरदस्तीने लोकांच्या माथी मारल्या सारखी करण्यात येत आहे.टंचाई काळात मेंदडी धरणाचे पाणी आटले आसुन आधीच या धरणावर मोठ्या लोकवस्तीची मेंदडी,तुरुंबाडी, काळसुरी,वारळ या गावासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत.सद्या स्थितीत धरणात पाणीसाठा उपलब्ध नसुन जे आहे ते गढुळ असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.योजना ठेकेदार यांनी मंजुर पाणी पुरवठा योजनेचे पाईप लाईन खोदकाम कामाला सुरुवात डांबरी रस्त्यालगतच केली आहे.नव्याने वारळ येथुन मेंदडीच्या दिशेने रस्ता रुंदीकरण काम सुरू आहे.अशामुळे मंजुर पाणी पुरवठा योजनेचे पाईप लाईनला बाधा येईल आणि पक्का रस्ता वारंवार खोदावा लागेल तसे होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.घाईघाईने होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने थांबविण्यासाठी वारळ ग्रामस्थ प्रमुख मधुसूदन पाटील,माजी सरपंच जहुर काझी,सुनिल सावंत,महेश बिराडी,शकील साठवीलकर, रफिक काझी आणि अन्य ५५ ग्रामस्थांनी अर्ज करून आग्रही मागणी केली आहे.