दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी:-लागूनच असलेल्या ग्रा.पं.पेठ अहमदपूर येथील बुद्ध विहारात सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.११ एप्रिल रोजी जनशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष मकरंद देशमुख यांनी दान केलेल्या अष्टधातूनिर्मित तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भंते भदंत रेवत, भंते भदंत मिलिंद व भंते भदंत आर्य सारीपुत्र (यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र.१ मधील बुद्ध विहारांमध्ये करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा.पं.पेठ अहमदपूर सरपंच शेख युसुफ, प्रमुख पाहुणे जनशक्ती संघटना अध्यक्ष मकरंद देशमुख,आष्टी न.पं.उपाध्यक्ष जनाब जाकिर हुसेन,अब्दुल हफीज,न.पं. पाणीपुरवठा सभापती सीमाताई निंबेकर, नगरसेवक रामकृष्ण सुरजुसे, नगरसेवक रेहान कुरेशी उपस्थित होते. याप्रसंगी भंते भदंत रेवत यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की,नेता मकरंद देशमुख यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची अष्टधातूची मूर्ती दान देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असल्याचे मनोगत व्यक्त केले. ग्रा.पं.सदस्य वैभव मेंढे यांनी सुध्दा यावेळी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी अष्टशील व सुगध बहुउद्देशीय संस्था व ग्रा.पं.पेठ अहमदपूर जनसंघटना येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती
