दैनिक चालु वार्ता रिसोड तालुका प्रतिनीधी -आत्माराम जाधव
मागील काही महिन्यांपासून रिसोड बस आगाराचा ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना वेळेवर बस मिळत नाही. त्याच बरोबर खेड्यापाड्यात दोन वेळा बस फेऱ्या योग्य वेळेत पोहोचत नाहीत.खासकरून प्रवाशांना बस वेळापत्रक चौकशी करीता दुरध्वनी क्रमांक 07251222336 हा आहे. माञ हा संपर्क कायमचा बंद आहे. चौकशी विभाग बंद असल्या कारणामुळे टी, आय यांना वारंवार फोन केला जातो. माञ प्रवाशाने केलेल्या कोणत्याही फोन कॉल ला संबधित अधिकारि प्रती उत्तर देत नाहीत.
महाराष्ट्र शासनाने प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक प्रकारच्या योजना आणि सुविधा दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बस सेवेला भरभरून प्रतिसाद देत आहेत. यामध्ये प्रामुख्याने महीला आणि जेष्ठ नागरिकांचा जास्त समावेश आहे.
परंतु रिसोड आगारा कडून चालविल्या जाणाऱ्या बससेवा बस ची अवस्था अतिशय दैनीय असुन बस वर नेम प्लेट देखील लावत नाहीत. त्यामुळे वृद्ध प्रवासी बस प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
संबधित एस टी महामंडळाने रिसोड आगाराकडे तातडीने लक्ष देवून सर्व पायाभूत सुविधा प्रवाशांना द्याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.
