
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
नांदेड–
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुगाव येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला.त्यांना पुष्पहार,इयत्ता आठवी चे इंग्रजी शब्दांचे रिडर ,वही,पेन व खाऊ देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मु.अ.तथा केंद्रप्रमुख बाबुराव कापसे हे होते.तर यावेळी जी .एस. मंगनाळे, राजेंद्र तलवारे,जयराम पाटील,किरण राठोड,शिवनंदा मुदखेडे आदी शिक्षक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.