
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
विविध संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- अंजनगाव सुर्जी येथील गणेश नगर येथे स्थानिक विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन काहीतरी समाज उपयोगी उपक्रम राबविणे आणि ते यशस्वीपणे कार्यक्रमाचे आयोजन पार पडण्याचे काम गेली अनेक वर्षे सातत्याने अंजनगावा सुर्जीत होत आहे.आद्य स्रि शिक्षणाचे जनक,थोर समाज सुधारक,छत्रपती शिवाजी महाराज यांची छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे,बहुजन उद्धारक,क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व सिम्बॉल ऑफ द नॉलेज,विश्वरत्न,थोर विचारवंत,भारतीय घटनेचे शिल्पकार ,बहुजनाचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर या गुरू-शिष्यांची एकत्रित जयंती साजरी करून समाजाला बौद्धिक खाद्य देण्यात आले.
यावेळी अहमदनगर येथील सुप्रसिध्द व्याख्याते व विचारवंत डॉ.नागेश गवळी यांनी संबोधित करताना सांगितले की,आजची परिस्थिती व शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा परस्पर वैचारिक संबंध आणि वसा यावर भर देऊन आपले विचार मांडले.आजच्या काळात या महापुरुषांच्या विचारांचं जागर वर्षभर चालू करा,कारण जयंती किंवा स्मृतिदिनानिमित्त हारांच ओझ महामानवाच्या गळ्यात टाकण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारांचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन वर्षभर जागर चालू करा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.नागेश गवळी यांनी केले
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या सयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन लोकसंवाद सामाजिक परिषदचे प्रवीण पेटकर,कर्मयोगी फाउंडेशनचे ललित ढेपे,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे विपुल नाथे,संभाजी ब्रिगेड चे प्रा.प्रेमकुमार बोके,क्रांती ज्योती ब्रिगेडचे गजानन कविटकर,महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अनिल वरहेकर,बारी समाज संघटनेचे निलेश ढगे,मराठा सेवा संघाचे बाळासाहेब गोंडचवर,माझा मित्र परिवाराचे वैभव खरोडे,टिपू सुलतान मेमोरियल फाउंडेशन चे समीर भाई,राष्ट्रीय चर्मकार संघाचे श्रीकांत नाथे,विचार मंचचे अनिल खालोकर,जिजाऊ ब्रिगेडच्या सीमा बोके,प्रिया गायगोले,बामसेफचे प्रा.डि.एन.हिरे,विजय रायबोले फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे भाऊराव वानखडे,मनोज मेळे यांनी आयोजन केले होते.
अंजनगाव सुर्जी शहरात व ग्रामीण भागात यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना जयंती उत्सव साजरे करीत होते.त्यामुळे एकाच उत्सवाकरिता येणार खर्च वाढत होता याचा पर्याय म्हणून सर्व सामाजिक संघटनांनी येऊन एकत्र उत्सव साजरे करावी ही संकल्पना प्रविण पेटकर यांनी मांडली गेली नुसती मांडली नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून ती अमलात सुद्धा आणली आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने व्याख्याते म्हणून डॉ.नागेश गवळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप देशमुख तर उदघाटक विदर्भकुमार बोबडे,प्रमुख उपस्थीती म्हणून मोहन जुनगरे,प्रदीप अडगोकर,अविनाश मेहरे,विपुल नाथे,ललित ढेपे,अनिल वरहेकर,बाळासाहेब गोंडचवर,निलेश ढगे,प्रेमदास तायडे,मो.सोहेल अब्दुल हक,सिमाताई हाडोळे,दीपालीताई पाथरे,सिमाताई बोके,प्रा.डी.एन.हिरे,विजय रायबोले,विचार मंत्र्यांवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शनपर प्रदिप देशमुख यांनी स्तुती उपक्रमाबद्ल अभिनंदन केले व अयोजकांनाचे आभार मानून याच पद्धतीने गावागावात उत्सव व्हावे असे प्रतिपादन सुध्दा केले.तर उदघाटन विदर्भ कुमार बोबडे यांनी सांगितले की,महामानवांचे विचार त्रिकाल बाधित सत्य असून ते पुढे नेण्याची गरज आजच्या समाजाला आहे असे संबोधित केले.
प्रसिद्ध व्याख्याते डॉ.गवळी यांनी छत्रपती शिवराय-महात्मा फुले-छत्रपती शाहू महाराज-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील वैचारिक समानता,गुरू-शिष्य संबंध,एकमेकांचा वसा पुढे नेण्याचे कार्य,महामानवांसोबत महानायिकांचे सामाजिक योगदान अश्या विविध घटनांवर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रवीण पेटकर यांनी केले तर प्रास्ताविक गजानन कविटकर तर आभार सुकेश अडगोकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाला गजानन चांदूरकर,प्रविणकुमार बोके,विनोद हाडोळे,शशिकांत नवले,जयेंद्र गाडगे,सुरज पवार,मधुर जाधव, मुकेश वानरे,अमोल हाडोळे.मनोज मेळे,वासुदेव काळे,धीरज काळे,जगदीश गोबरे,संदीप अपाले,गौरव काविटकर,योगेश चिमोटे,श्रीकांत नाथे,देवानंद महल्ले मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य सर्वच स्तरातून समाजबांधव सहपरिवार उपस्थित होते.