
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- दि.२४/०४/२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या वतीने जाहिर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी पक्ष प्रमुख व तेलंगाना राज्याचे आ.मुख्यमंत्री श्री चंद्रशेखरराव स्वतः येणार आसल्या कारणाने वाहन चालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जय संघर्ष वाहन चालक, चालक – मालक संस्था व संघटनेच्या सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांच्यासह पक्ष प्रवेश करण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली व पक्ष प्रवेशाच्या वेळी जय संघर्ष संस्था व संघटनेतील सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी दि.२४/०४/२०२३ रोजी बहुसंख्येने छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहून संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांच्यावर आसणारा दृढ विश्वास दाखवून द्यावा आसे खालील सर्व पदाधिकार्यांच्या वतीने आव्हान करण्यात आले.
मिटिंग मध्ये वाहन चालकांच्या मागण्या़चे निवेदन आ.मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांना देऊन आगामी BRS पक्षाच्या 2024 च्या निवडणूक जाहिर नाम्या मध्ये वाहन चालकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येईल आसा प्रामुख्यानें उल्लेख आसावा अशी अग्रही मागणी BRS च्या पक्ष श्रेष्ठीकडे करण्यात यावी आसे सर्वांनी एकमताने सुचवले.
मिटिंग मधे जय संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर, फांउंडर मेंबर श्री संतोष गढवे,उपाध्यक्ष श्री सोमनाथ गायकवाड, सचिव श्री निखिल कुलकर्णी,सहसचिव श्री सुरेश गायकवाड, कोषाध्यक्ष श्री रमेश कोलते,सहसंघटक श्री अब्बास खान,प्रचार ,प्रसार व सोसल मिडियाचे प्रसिद्धि प्रमुख श्री सागरसिंग राजपुत,तसेच संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष श्री लक्ष्मण वाघ बाबरेकर,जिल्हा सचिव श्री संजय नलावडे,रिक्षा संघटनेचे छत्रपती संभाजीनगर शहर अध्यक्ष श्री आकाश इंगळे,सदस्य अश्पाकभाई,ज्ञानेश्वर हाळनोर आदीचा उपस्थिति होती.