
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई ;- येथील ४ थे जिल्हा व सत्र न्यायालयात सत्र केस क्र. ९९/२०२२ सरकार वि.प्रशांत व इतर याप्रकरणाची सुनावणी होऊन मा.न्या.कुणाल जाधव साहेब यांनी दि.१४/०४/२०२३ रोजी सबळ पुराव्या अभावी परळी येथील ७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, आमचे गल्लीत प्रशांत बारसकर तसेच बाजुच्या गल्लीत सुरज चौडे असे रहावयास बारसकर यांचे सोबत आमचे जुने वैर असुन दि. ३०/०४/२०२२ रोजी अंदाजे ७-४० वाजताचे सुमारास आमच्या गल्लीतील अक्षय जाधव नावाचा मुलगा आमच्याकडे कडे आला व माझ्या आईला म्हणाला की, तुमच्या शैलेशला खुप लागले आहे आणी तो नांदुरवेस येथील पुलाजवळ रस्त्यात पडलेला आहे त्यानंतर त्याने माझे आईने मोबाईल वरुन मला फोन केला आणी सदरची घटना सांगीतली त्यानंतर माझे वडील व आई लागलीच त्या जागेवर गेले तेंव्हा तेथे मी होतो. तेंव्हा तेथे माझा भाऊ शैलेश याचे माणेवर, चेह-यावर, पोटावर कसल्यातरी शस्त्राने भोसकून जखमी केल्याचे व त्यामुळे जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे आम्हाला दिसले. म्हणुन मी त्याला सदरची घटना कशी झाली याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला परंतु शैलेश काहीएक बोलत नव्हता. म्हणुन आम्ही त्यास लागलीच ऑटो रिक्षामधुन उपचारकामी सरकारी दवाखाना परळी येथे दाखल केले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर माझ्या भावाच्या प्रेतावर आम्ही नातेवाईकांनी अंतीम संस्कार केले आहेत त्यानंतर तेथील लोकांनी मला सांगीतले की, माझा भाऊ शैलेश याला सुरंग चौड़े वि स्वामी, गजु लासे, भैय्या रायबोळे विकी ऊर्फ भुरु रायबोळे, संतोष काळे यांनी पकडले आणी प्रशांत कफ भैया बारसकर याने चाकुने भोसकले आहे.
माझा भाऊ शैलेश याचे सोबत १) प्रशांत बारसकर २) सुरज चौड़े ३) विरभद्र स्वामी ४) गजु लासे ५)भैय्या रायबोळे ६) विकी ऊर्फ भुरु रायबोळे ७) संतोष काळे यांनी भांडण काढुन यातील प्रशांत बारसकर याने चाकुने माझा भाऊ शैलेश चेह-यावर, मानेवर, पोटावर भोसकुन जखमी करून खुन केला आहे म्हणून योगेश राजनाळे याच्या तक्रारीवरुन वरील लोकांविरुध्द गु र न ८६/२०२२, कलम ३०२,१४३,१४९ परळी शहर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील प्रकरणाची सुनावणी मा.न्यायालयात झाली असता एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले, आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद व बचाव गृहीत धरून सदरील स्पेशल केस क्र. ९९/२२ प्रकरणातील वरील सर्व आरोपी यांची मा.न्या.कुणाल जाधव साहेब यांनी दि.१४/०४/२०२३ रोजी सबळ पुराव्या अभावी परळी येथील ७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात वरील आरोपीतर्फे ऍड.अजित लोमटे यांनी काम पाहिले.त्यांना ऍड.किशोर देशमुख,ऍड.नवनाथ साखरे,ऍड.धनराज लोमटे, ऍड.ओमप्रकाश धोत्रे,ऍड.विश्वजित जोशी व ऍड.विवेकानंद गिराम यांनी सहकार्य केले.