
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा: नागपुर येथील खासदार पद्मश्री विकासजी महात्मे साहेब यांच्या एकच मिशन सर्वांना पेन्शन या चळवळीची सुरुवात काल दि.17/4/2023 पासून नागपुर येथे चालू झाली.सदरच्या चळवळीच्या मूहूर्ताच्या प्रसंगी उपस्थित राहण्याचा माझा योग श्री संजय हाळनोर साहेबां मुळे जुळून आला.तेव्हा जमलेल्या सर्व उपस्थितांना मार्ग दर्शन करतांना श्री विकासजी महात्मे साहेबांनी सांगीतले की सर्व सरकारी कर्मचार्यांना तसेच आमदार खासदार मंत्री या लोकांना पेन्शन लागू आहे. हे सर्व सरकारी काम करतात व सरकारसाठी करतात परंतु काम करता करता यांचे वय 60 च्या पूढे होऊन जाते आणि सा़ठी नंतर सर्वांना घरी बसून पेन्शन दिली जाते.कारण वयाच्या सा़ठी नंतर काम होत नाहि म्हणून पेन्शन मिळते.तसेच आपल्या वाहन चालक बंधुचे पण आहे व विविध प्रकारचे काम करणारे लोकांचे पण आहे.
जे आपल्या पोटासाठी,परिवारासाठी व आपल्या देशासाठी काम करतात त्या सर्वांना पण वयाच्या साठी नंतर काम होत नाहि.आशा कारागिर ,शेतकरी,शतमजूर व इतर कष्टकरी वर्गाला पेन्शन का नाहि. आपण पण इतरा प्रमाणे प्रत्येक वस्तुच्या खरेदीवर टॅक्स देतो जसे सरकारी कर्मचारी व आमदार खासदार देतात.मग त्यांना पेंन्शन मीळत आसेल तर या असंघठित वर्गाला का पेन्शन मीळत नाहि.म्हणून एक नवीन चळवळ सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सर्व संघटना मीळूण आपण एकजूटीने श्री विकासजी महात्मे साहेबांचे व आपल्या जय संघर्ष संस्था/संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर साहेबांचे हात बळकट करावेत हि विनंती.
श्री अमोल नारायणराव खापेकर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था नागपुर जि.अध्यक्ष.