
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख.
===================
निलंगा दिनांक 18/04/2023 रोजी मौजे शिऊर येथे मा. नायब तहसीलदार श्री घनशाम अडसूळ साहेब यांच्या उपस्तीतीत गाव बैठक घेण्यात आली. या बैठकीत मा अडसूळ साहेब यांनी शेत पाणंद रस्ते रुंदीकरण करण्यासंबंधी मार्गदर्शम करून, शिव पाणंद रस्ते रुंदीकरण कलेल्यानंतर शेतकरी यांना होणारे फायदे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्या नंतर गाव नकाशावर येणारे पाणंद रस्ते, शिव रस्ते , पाय वाट रस्ते, अश्या सर्व रस्त्याची माहिती दिली. त्या नंतर गाव सहभागातून कश्या पद्धतीने रस्ते खुले करून रस्त्याचे रुंदीकरण करता येते या विषयीही माहिती दिली. या कार्यक्रमात मा. नायब तहसिलदार साहेब यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गावचे तलाठी पोचापुरे साहेब, काटेजवळगा तलाठी टेंकाळे मॅडम, सरपंच श्री भानुदास सूर्यवंशी, उपसरपंच श्री शेषेराव बंडगर, सदस्य शफी सय्यद, सोसायटी चेअरमन श्री दिनकर बिरादार, तंटा मुक्ती अधेक्ष ज्ञानोबा तुगावे, तसचे गावातील प्रतिष्ठीत वेक्ती, अमीर सय्यद, ज्ञानदेव सूर्यवंशी ,व्यंकट सोमवंशी, सूर्यवंशी लक्षण, तसेच गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते.