
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर –
दोन दिवस सारक्षी फाउंडेशन चंद्रपूर तर्फे निशुल्क नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले,बरेच नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी माथोली, जुगाद, कैलाश नगर चे सरपंचा सौ.ज्योतीताई सुनील माथुलकर की खूप छान प्रकारे पार पडले शिबीरात उपस्थित असणारे ग्रामपंचायत सदस्य,नागरिकांचे व तसेच सारक्षी फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त केले.
माथोली गट ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ.ज्योती माथुलकर यांनी सारक्षी फौंडेशनचे पदाधिकारी व डॉ.बोबडे यांचे स्वागत करून नेत्र तपासणीला सुरुवात करण्यात आली होती.या दोन दिवशीय मोफत नेत्र शिबिरात गावातील व परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बनसोड मॅडम,ग्रामपंचायत सदस्या मनिषा किशोर उरकुडे,आशा वर्कर माळपाचे, बाळा तामगाडगे, मोहोजे व गावातील नागरिक उपस्थित होते.