दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
मुंबई: स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहक जार मधून पाणी विकत घेतात या पाण्याची शुद्धता स्वच्छता आणि आरोग्य तपासण्यासाठी सध्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही या जार मधून पाणी विकणाऱ्यांना यापुढे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे यासाठींच्या अधिसूचनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान दिली.
