दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी ; दरवर्षी देगलूर शहरातील व ग्रामीण भागातील निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा १००० रुपये हे अनुदान शासनाकडून दिले जाते मात्र या योजनेसाठी तहसील कार्यालयाकडून दरवर्षी 21 हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र दाखल करण्याची जाचक अट लागू केल्याने वयोवृद्ध महिला व नागरिकांना त्रास होत असल्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी ठाकरे शिवसेना शहर प्रमुख संजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली व नागरिकांच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे
देगलूर शहरातील व ग्रामीण परिसरातील निराधार निराश्रीत, संजय गांधी योजना, अपंग, अंध, वृद्धापकाळ, श्रावण बाळ योजनेतील मंजूर झालेले लाभार्थी हजारो आहेत. पूर्वी यादीत नाव येण्यासाठी लागणारे आवश्यक की त्या कागदपत्राची पूर्तता केलेली आहे व शासनाकडून लाभ मिळत आहे दरवर्षी आम्ही हयात असल्याचे दर तीन महिन्याला प्रमाणपत्र दाखल करीत असतो मात्र मागील वर्षापासून हयात पाहून उत्तरा सोबत 21000 रुपयाचे उत्पन्न मर्यादा प्रमाणपत्र दाखल केल्याशिवाय आम्हाला अनुदान देत नाहीत ही जाचक आठ अतिशय त्रासदायक असून निरक्षर निराधार वृद्ध असलेले लाभार्थी असून या कागदपत्राची पूर्तता कशी करावी व विनाकारण आम्हाला अनुदान मंजूर असताना नाह त्रास होत देत आहेत त्यामुळे वृद्ध महिलांना उन्हातान्हात फिरत असताना त्रासदायक होत आहे तरी 21000 रुपयाचे उत्पन्न मर्यादा प्रमाणपत्राची जातीचक अट रद्द करण्यात यावी अन्यथा आम्हाला अर्ज दिल्या पंधरा दिवसात आपल्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील रद्द करण्याची मागणी देगलूर शहर शिवसेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर शहर प्रमुख संजय जोशी, महेश मारोतराव पाटील ,तालुका प्रमुख शिवसेना, राजेश कोडे ,एकनाथ जोशी, बालाजी वडजे अमृतराव कोडे, बालाजी गंगाराम जोशी, गंगाधर मिस्त्री, देविदास मारुती मंदलपवार, आदी शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
