
दैनिक चालू वार्ता भुम प्रतिनिधि
भूम :-शहरातील कु सिफा मुलाणी हिने रोजा करून सर्व समाजातील प्रत्येकाच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
पवित्र रमजान महिन्यातील रोजा कु.सिफा मुलाणी केला असून ईश्वराकडे संपूर्ण जगातील मानव जातीला सुख, संपदा, ऐश्वर्या, मिळावे, सर्वत्र शांतता नांदावी अशी प्रार्थना केली आहे. यासाठी लहान थोर मंडळी प्रमाणे महिन्यातील अरवेरच्या टप्प्यातील एक दिवसाचा उपवास करून सर्वांच्याच निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे. या लहान चिमुकलीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.