दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक22/04/2023/रोज शनिवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची 918 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. आसे महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील आचेगावकर व कार्यअध्यक्ष सतोष पाटील यांनी सांगितले आहे.
22एप्रिल2023 रोजी सकाळी आठ वाजता षठस्थल भगवा ध्वजारोहण करून बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन
देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या शुभहस्ते होनार आहे. प्रमुख उपस्थिती आमदार सुभाष साबणे
, नांदेड जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर
माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार
माजी नगराध्यक्ष पद्मावार सावकार
कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अनिकेत पाटील
उपाध्यक्ष अँड रवि पाटील
देगलूर नगरीतील सर्व नगरसेवक,सर्व डॉक्टर,व्यापारी, शिक्षक, जेष्ठ नागरिक उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आध्यक्ष प्रशांत पाटील आचेगावकर व कार्यअध्यक्ष सतोष पाटील येरगीकर* यांनी केले आहेत.
दुसऱ्या सत्रात 4-00वा.समितीचे प्रशांत पाटील आचेगावकर व सतोष पाटील यांच्या अध्यक्ष व कार्यअध्यक्ष ते खाली बंडयाप्पा मठसंस्थान गांधी चौक देगलूर येथून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ढोलताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी आमदार
जितेश अंतापुरकर,
माजी आमदार सुभाष साबणे,
माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार
माजी नगराध्यक्ष पद्मावार सावकार व
सर्व प्रशासकीय अधिकारी बसवप्रेमी व समाज बांधव या शोभायात्रेत सहभाग घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येनार आहे. तरी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने देगलूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
