दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत परंतू खालच्या पातळीतून त्या योजना योग्य पद्धतीने राबविले जात नसल्यामुळे अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.
देगलूर तालुक्यातील अनेक खेडेगावात शासनाच्या विविध योजना राबविल्या असताना त्या योजनेतील शौचालय योजनेचा तीनतेरा झाले असून आजघडीला नागरिक शौचालय रस्त्यावरच करीत असून अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे परंतू प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.
शासनाने हगंदारी मुक्त गाव करण्याचे आदेश काढले असताना याचा पुरेपूर फायदा उचलत प्रशासनाने लाभार्थ्याला साडेबारा हजार रुपयाचा अनुदान देऊन सुद्धा शौचालयाचा वापर न करता फक्त देखावा म्हणून ठेवण्यात आला आहे. परंतू याचा वापर होतो का नाही याची दखल कोणतेच प्रशासन घेत नसल्यामुळे व गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावरच नागरिक शौचास बसतात व याचा त्रास या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे. पावसाळ्यात तर अशा प्रकारामुळे गॅस्ट्रोचे प्रमाण वाढत आहे तरीसुद्धा या सर्व गोष्टीकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे
सध्याची परिस्थिती प्रशासनाकडून गाव तेथे स्मशानभूमी, हगंदारी मुक्त गाव, अंध मुक्त गाव, हर घर
जल, प्रधानमंत्री आवास योजना असे अनेक योजना राबवत असताना नागरिकांकडून या योजनांचा दुरुपयोग केला जातो.
हगंदारी मुक्त गाव करण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबवून सुद्धा नागरिकांमध्ये कसल्याच प्रकारचा बदल होत नसल्यामुळे याचा परिणाम आरोग्यावर होत आहे, तरीसुद्धा शासनाकडून बांधून देण्यात आलेल्या शौचालयाला जसे पुरातन काळातील वस्तू देखाव्यासाठी वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येतात त्याच पद्धतीने या शौचालयाला ठेवण्यात आले आहे.
तरी प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून हगंदारी मुक्त गाव करेल की हगंदारी युक्त गाव करेल या सर्व प्रकाराकडे गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे लक्ष आहे.
