दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड- -साडेचार लाख ऊसतोड कामगारांना ओळखपत्र पोहचवा, प्रत्येक योजना गरजूपर्यंत गेली पाहिजे, ग्रामसेवकांनो हे काम करा असे आवाह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोड कामगारांच्या अनेक योजना सरकार आणि गोपीनाथराव मुंडे महामंडळाअंतर्गत राबविल्या जातात. जिल्ह्यातील साडेचार लाख ऊसतोड कामगारांपैकी फक्त आतापर्यंत 10 हजार कामगारांनाच ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. येत्या दोन महिन्यात या सर्व ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यासाठी ग्रामसेवकाने नियोजन करावे, त्यांची नोंदणी करून घ्यावी, शासकीय योजनेच्या ‘जत्रा महोत्सवात ‘ गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तलावातील गाळ शेतात पोहचवता कसा येईल याचेही नियोजन संबंधित विभागांनी करावे यासह सर्व योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत्या करा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये जत्रा महोत्सवाअंतर्गत जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या दारी या अंतर्गत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारीआणि इतर सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे वर्कशॉप (कार्यशाळा आयोजीत
करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार,
सहायक जिल्हाधिकारी जिवणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे, केकान, मुख्य वित्त तथा लेखाधिकारी जटाळे, तहसीलदार सुहास हजारे आदी उपस्थित होते.
