
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
21 एप्रील (पुणे )
भारतीय दलित कोब्रा तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीवाटप तुळशीदास अडकुजी डोंगरे यांच्या स्मृती दिनानिमित्त भारतीय दलित कोब्रा आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात डोंगरे यांच्या कन्या डॉक्टर अमिता पाटील यांच्या उपस्थितीत भाई विवेक चव्हाण व फुले शाहू विचार मंच प्रमुख विठ्ठल दादा गायकवाड वनिता चव्हाण यांच्या हस्ते दोन गरीब होतकरू मुलींना कुमारी नूर जहा व कुमारी मल्लम्मा यांना प्रत्येकी 15 हजार रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले भारतीय दलित कोब्रा च्या सहकार्याने दरवर्षी विविध मान्यवरांच्या स्मृतिदिनानिमित्त किमान 200 गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते कार्यक्रमाचे आयोजन व्यंकटेश मळकल यांनी केले