दैनिक चालु वार्ता चाकुर तालुका प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
चाकुरचे कर्तव्यदक्ष, अत्यंत संवेदनशील, मनमिळावू आणि कार्यतत्पर तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे साहेब यांना काल दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी अतिशय भाऊक वातावरणात निरोप देण्यात आला.
तब्बल 3 वर्षे 7 महिने आपली सेवा बजावून डॉ शिवानंद बिडवे यांची उस्मानाबाद तहसीलदार म्हणून बदली झाली असून यामुळे मागच्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत तहसीलदार म्हणून त्यांनी जोडलेली माणसे बिडवे साहेबांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती, यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिक यांची मने भरून आली होती.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी श्री प्रवीण फुलारी साहेब उपस्थित होते, तहसीलदार साहेबांच्या सुविद्य पत्नी शीतल बिडवे, मुलगा श्लोक व बिडवे साहेबांच्या आई या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
तहसील कार्यालयाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार दिगांबर स्वामी साहेबांनी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांचे स्वागत केले. तलाठी संघटनेतर्फे अध्यक्ष अविनाश पवार, सचिव कमलाकर आरडले, मंडळ अधिकारी बेजगमवार साहेब, बेलगावकर साहेब, केंद्रे साहेब व येमले मॅडम यांनी स्वागत केले, अव्वल कारकून संवर्गातून महेश राठोड यांनी, कोतवाल संघटनेतर्फे निवृत्ती हालसे, गणेश चींतनपल्ले, सदानंद क्षिरसागर, विठल शिंदे व इतर सर्व कोतवालानी स्वागत केले, महसूल कर्मचारी संघटनेतर्फे शिवाजी मुळे, नरसिंग आलूरे, रामदास रेड्डी, रामदास माने व शेख साहेब यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी प्रशांत तेरकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
निरोप समारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायत चाकुरचे नूतन मुख्याधिकारी अजय नरळे, उस्मानाबाद येथून आलेले नायब तहसीलदार राजाराम किल्लोरकर, सहाय्यक निबंधक आर एम जोगदंड व कीलचे साहेब उपस्थित होते…
तलाठी संवर्गातून डी डी तेली, शंकर लांडगे, एम के पाटील, संतोष स्वामी, शिवकुमार कस्तुरे, मौला शेख, बालाजी हाक्के, कलीम शेख, बी यू पाटील, सागर फुलसुरे, संजय जोशी, बालाजी जमादार, बी बी मजगे, परमेश्वर माने, दत्ता कोळी, मुक्ता भुरकापल्ले आदी तलाठी उपस्थित होते..
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तलाठी संघटनेचे अध्यक्ष अविनाश पवार, मंडळ अधिकारी शाम बेलगावकर, मनिकप्रभू बेजगमवार, तलाठी बालाजी हाक्के, शंकर लांडगे आदी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
तहसीलदार बिडवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की त्यांच्या साडेतीन वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचे खरे श्रेय तालुक्यातील जनतेचे आहे. चाकुर तालुक्यातील जनता ही सुज्ञ व प्रशासनास सहकार्य करणारी असल्यानेच तालुक्यात काम करताना कोठेही अडचण जाणवली नाही.
तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते हे अतिशय समजूतदार व एकोप्याने काम करत असल्याने आपणाला काम करताना कधीही राजकीय दबाव टाकण्यात आला नाही. तालुक्यातील पत्रकार बांधव हे कन्स्ट्रकटिव्ह पत्रकारिता करतात यामुळे आम्हाला एखादी चूक झाली तरीही ती सुधारण्यास मदत होते. तालुक्यातील महसूल बरोबरच पोलिस व आरोग्य कर्मचारी यांच्या सोबत कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली यावेळी त्यांच्या अमूल्य सहकार्यामुळेच कोरोना सारख्या महामारीत तालुका प्रशासन व्यवस्थित हाताळता आले.
तालुक्यातील फील्डस्टाफ म्हणजेच तलाठी व मंडळ अधिकारी हे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचे आहेत याचा मला निश्चितच अभिमान आहे तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनीही वेळोवेळी मदत केली.
