
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी:-किरण गजभारे
लोकनेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वतीने धर्माबाद शहरातील सरस्वतीनगर वासीयांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध; मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न.
धर्माबाद शहरांतील सरस्वतीनगर भागांतील नागरीकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत होती याबाबतीत स्थानीक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष सौ मीना राजू भद्रे व अल्प संख्याक आघाडी अध्यक्ष सयद अन्सार यांना कळविले ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या सहकारी सोबत घेऊन काही एक महिन्यापूर्वी हा प्रकार लोकनेते श्री मारोतराव कवळे गुरुजी यांच्या लक्षात आणून दिला . पिण्याच्या पाण्यासारखा संवेदनशील विषय व त्याचे महत्त्व लक्षात येऊन श्री कवळे गुरुजी यांनी तत्काळ पाण्याची टाकी उभारण्याची जबाबदारी घेतली. सदरील टाकीचा लोकार्पण सोहळा आज दी.२१ एप्रिल रोजी संपन्न झाला व जलपूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना लोकनेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी सर्वसामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझे प्रयत्न सातत्याने चालू असतात विकसासोबतच तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी विशेष लक्ष देतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून मी सेवा कार्य करीत आहे. जनतेच्या शुभेछा, आशीर्वाद व सोबतच विश्वासाहर्ता आमच्या पाठीशी भक्कम असल्यानेच आजपर्यंतचा खडतर प्रवास सहजरित्या शक्य झाला यापुढे देखील जनसेवेचे कार्य अखंडित चालु राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी व्यापीठावर काँगेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य वर्णी नागभुषन ,नगर परिषद माजी पाणी पुरवठा सभापती रविंद्र शेटी,शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हा प्रमुख गणेश गिरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष जावेद सर,शिवसेना तालुका प्रमूख रामचंद्र रेडी, बाजार समिती चे माजी संचालक व्यंकट पाटिल मोरे,राजू शिरामने, पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश पाटील शिंदे, भगवान कांबळे,मोहन पाटील सुर्यवंशी, लतिफ बाबा, शिवाजी पाटील शिंदे यांच्या सह या वार्डातील शेकडो नागरीक उपस्थीत होते.
प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सौ मीना राजू भद्रे यांनी केले त्या म्हणाल्या की आम्ही शिष्टमंडळासह जेव्हां श्री कवळे गुरुजी यांची भेट घेऊन हा विषय मांडले तेव्हां क्षणाचाही विलंब न करता त्यांनी होकार दिला यामुळेंच ही पाण्याची टाकी उपलब्ध झाली व पाण्याच्या समस्येवर उपाय निघाला सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन गुरुजींनी केलेले सेवाकार्य अविस्मरनिय आहे.असे त्या म्हणाल्या.
आभारप्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष जावेद सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक सौ. मिणा राजू भद्रे,सयद अन्सार, फेरोज कुरेशी, जमील भाई व सहकऱ्यानी परिश्रम घेतले.