दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव .
नांदेड येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर नांदेड येथे क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे , शालेय समिती सदस्य सूर्यकांत कावळे , उपप्राचार्य परशुराम येसलवाड , उपमुख्याध्यापक डी.पी. कदम , पर्यवेक्षक श्री सदानंद नळगे व शिवराज पवळे यांच्यासह श्री अनिल मेहकरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रथमेश पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तथा सर्वांच्या उपस्थितीत जयंती सोहळा संपन्न झाला . .प्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा बसेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविध मान्यवरांच्या वतीने प्रकाश टाकण्यात आला यावेळी श्री शिवाजी हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर नांदेड चे सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा ज्येष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवाजी हायस्कूलचे पर्यवेक्षक मराठी विभाग प्रमुख शिवराज पवळे यांनी केले.
