दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
आज मौ.बेटमोगरा येथे समतानायक महामानव क्रांतीसूर्य जगज्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव समाज बेटमोगरा सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने गुरुवर्य सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर व बेटमोगरा गावचे सुपुत्र मुखेड कंधार विधान सभेचे मा.आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते महात्मा बसवण्णा च्या प्रतिमेचे पूजन करत महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या नियोजित जागेच्या नामफलकाचे अनावरण समस्त वीरशैव समाज बांधव व गांवकरी मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले प्रसंगी ग्रां.पं.सरपंच,उपसरपंच,से.स.सो.चेअरमन,तंटामुक्त अध्यक्ष,ग्रां.पं.सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरीक समाजबांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले समाज बांधव व बसवप्रेमीनी मा.आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व ग्रां.पं.सरपंच यांचे जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले जय बसव.
