दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक- मोहन आखाडे
भारत राष्ट्रीय समिती पक्षाने तेलंगणा राज्यात जे विकासाचे मॉडल राबवले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात अब की बार किसान सरकार आणण्यासाठी पक्ष प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित
24 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता बीड बायपास जबिंदा ग्राऊंडवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत “राव’ राजकीय भूमिका जाहीर करतील. तसेच 40 माजी नगरसेवक, आमदार, खासदार, शेतकरी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करणार आहेत. अशी माहिती बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी आमदार जीवन रेड्डी, राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशू तिवारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
बीआरएस राष्ट्रीय पक्ष आहे. गत आठ वर्षांत पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री के. सी. राव यांनी तेलंगणाचा सार्वांगीण विकास केला आहे. जेडीपीत सर्वाधिक वाटा असून शेतकरी, महिला, बेरोजगार, उद्योग, व्यवसाय आदी सर्वच क्षेत्रात विकास क्रंाती घडवून आणली आहे. जातीभेद, मनभेद आम्ही करत नाही. विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली जाते. जाहिरनाम्यात जे सांगितले आहे त्याची प्रत्यक्ष कृती केली जाते. त्यामुळे एकही शेतकरी आत्महत्या होत नाही.
अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना 5 लाखांचे विमा संरक्षण कवच दिले आहे. घरोघरी शुद्ध पिण्याचे पाणी दिले जाते. तुमच्या ऐतिहासिक शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणीच मिळत नाही. तेलंगणात कोटी लोकसंख्या आहे. महाराष्ट्रात बारा कोटी जनता असून धन संपदा भरपूर आहे. मात्र, लोकप्रतिनिधींचे मन चांगले नाही. परिणामी विकास खुंटला आहे.
दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात. मुलभूत विकास झालेला नाही. हिच मोठी शोकांतिका असून आम्ही यात गतीमानतेने बदल करण्यासाठी महाराष्ट्रात पाऊल ठेवले आहे. नांदेडमध्ये पहिली, लोहा – कंधार मतदारसंघात दुसरी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तिसरी भव्य सभा होत आहे. लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहून चांगला प्रतिसाद देत आहेत. महाराष्ट्र, ओरीसा राज्यात तेलंगणाचे सोयरे संबंध आहेत. त्याचाही आम्हाला फायदा होत आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण बदलून जाणार असल्याचे तिवारी व रेड्डी म्हणाले. यावेळी खासदार बी. बी. पाटील, आयडीसीचे अध्यक्ष वेणुगोपाल चारी, किसान समितीचे अध्यक्ष माणिक कदम, प्रदीप सोळुंके, शंकर धोंडगे आदी उपस्थित होते.
