दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
किनवट : तालुक्यातील इस्लापूर पोलिस ठाण्याच्यां हद्दीत अवैद्य वाळूची वाहतूक करणारा टिप्पर इस्लापूर पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतला असून कायदेशीर बाबी तपासुन नियमानुसार कारवाई केली जाईल असे सांगण्यात येतआहे.
लोहा तालुक्यातील मौजेअंतेश्वर तालुका लोहा येथील टिप्पर क्रं एम.एच.२६बी ९९८८ ह्या नंबरचा टिप्पर वाळूचा अवैद्य साठा घेऊन गुप्त मार्गाने मौजे कोल्हारी कडून इस्लापूरकडे येत होता. ही माहिती पोलिस प्रशासनाला कळताच,पोलीस स्टेशन इस्लापूरचे एपीआय रवी वाहुळे यांनी त्यांचे पथक घेऊन टिप्परचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावर बारकाईने पाळत ठेवली होती. मौजे इस्लापूर जवळच हा टिप्पर थांबवून टिप्परच्या चालकांकडून कागदपत्राची मागणी केली असता,टिप्पर चालकाने वाळु वाहतूक पास,रॉयल्टीच्या पावत्या, नसल्याचे सांगितले.तेव्हा तलाठी केशव थळंगे यांना सोबत घेऊन सदरील टिप्पर ताब्यात घेऊन इस्लापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलेआहे.अनुचित प्रकार घडू नये म्हणून इस्लापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे,सहाय्यक उपनिरिक्षक सुभाष निवळे,शिवाजी तोंडेवाड , पो.काँ.शिवाजी साखरे,अरुण मडावी हे कर्मचारी घटनास्थळी हजर होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे,तलाठी केशव थळंगे,अंकुश सकवान,देविदास कांबळे,सुदर्शन बुरकुले यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तहसील कार्यालय किनवटला पाठवण्यात आलाआहे.असे सांगण्यात आलेआहे.तेव्हा
तहसीलदार या प्रकरणात काय कारवाई करतील?याकडे जनतेचे लक्ष लागुन आहे.मौजे ईस्लापुर,शिवणी, अप्पारापेठ,जलधारा,बोधडी,गोकुंदा, मांडवी,उमरी बाजार,सारखणी,वाई बाजार,निचपुर,सिंदगी-मोहपुर आदी भागात मोठ्या प्रमाणात दगड,मुरुम,माती,वाळु माफियानी त्या त्या संबंधित तलाठी,मंडळाधिकारी, अव्वल कारकुन,लिपिक,नायब तहसीलदार गौण खनिज शाखेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवैध वाहतूक व उत्खनन करण्यास जाणीवपूर्वक मुकंसहमती दिली असल्याने दररोज जेसीबी,पोकलेन मशीनने खोदकाम करुन कोटी रुपयांचा महसूल बुडवुन काळी कमाई केली जात आहे.यास छुपा पाठिंबा राजकीय वलयप्राप्त पक्षांतील सत्ताधारी व विरोधी गाव पुढार्राचा असल्याने महसूल कर्मचार्यांनी कारवाई करताना राजकीय दबाव तंत्राचा वापर करत असल्यामुळे सुध्दा अडचण येतअसल्याचे कारण सांगितले जातआहे.भविष्यात सुद्धा महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ठोस अशी कारवाई निरंतर पणे करुन शासनाचा महसूल कसा वाढेल,याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
