दैनिक चालु वार्ता श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी -विनोद भारती
मागील काही दिवसापासून माहूर तालुक्यात वादळी वारे, गारपीट व अवकाळी पावसाने संसारपयोगी साहित्यासह उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. दि.22 एप्रिल रोजी आ. भीमराव केराम यांनी तहसीलदार किशोर यादव यांचे समवेत वानोळा महसूल मंडळातील वानोळा, कुपटी,साकुर, दहेगाव,सावरगाव,दिघडी, ईवळेश्वर,महादापूर, तांदळा आदी गावाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दि.21 एप्रिल रोजी सायं. च्या सुमारास वानोळा महसूल मंडळातील अनेक गावात सोसाट्याचा वारा, गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावली.त्यात घरासह ज्वारी, हळद, तीळ,भुईमूग,मका आदी उन्हाळी पिकांच्या झालेल्या नुकसानीची आ.भीमराव केराम यांनी पाहणी करून शासनाची मदत मिळवून देण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या तहसीलदारांना सूचना केल्या. यावेळी त्यांचे समवेत किनवट नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे, भाजपाचे शहराध्यक्ष सागर महामुने,जिवन अग्रवाल, अशोक जोशी,श्रीराम भुसारे, ओम भुसारे, प्रकाश भुसारे, साहेबराव जाधव, राम पानचौरे, दिगांबर शेळके, प्रमोद कदम, गजानन घोटकर, यशवंत खरवडे, पंकज कुसराम, निलेश तायडे, पांढरीनाथ ठाकरे,विशाल कदम,अजय पवार, बबन जाधव, बाबाराव पाटील, राजु पांडे यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
