दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी- विजयकुमार चिंतावार.
कृषी उत्पन्न बाजार समिती कडून निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर.कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणूक लढवीत असलेल्या शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराची सुरूवात ही नांदेड रस्त्यावर असलेल्या महादेव मंदिर येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आली व शहरात जाहीर सभा ठेवण्यात आली होती.
शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील गणराज रिसोर्ट येथे जाहिर सभा ठेवण्यात आली होती त्यावेळी ते व्यासपीठावर बोलताना
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्यांची असली तरीही ती माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे,ही निवडणूक माझ्यासाठी खूप मोठी नाही परंतु आगामी निवडणुकांची ही पूर्वतयारी आहे, मागील दहा वर्षात शहरासह तालुक्यात विकासाच्या दृष्टीने अनेक विकास कामे केले आहेत, आपण विकास कामे केलेल्या मतदार संघात दुसरे कोणीतरी घुसू पाहत आहे, त्यामुळे मी या निवडणुकीत स्वतः लक्ष घालत आहे,आपण कष्टाने उभारलेल्या घरात इतरांना थारा देऊ नका,त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असेही ते म्हणाले, काही माणस हंगामानुसार जशी फळे येतात ती फळे खायायला येतात खाऊन झालं की निघून जातात, मग त्यांना मतदारसंघाच काही देण घेण नसत ती फक्त निवडणुकी पुरतीच उगवत असतात अशी खोचक टीका ही विरोधकांवर त्यांनी केली, मागील दोन ते तीन वर्षात जी काम मी केलीत त्यात मी महाराष्ट्र, मराठवाड्याला तर विकास कामात न्याय दिलाच, नांदेड जिल्ह्यातही विकास कामे केली परंतु सर्वात जास्त झुकते माप मी कोणाला दिले असेल तर ते आपला मतदार संघ असलेल्या भोकर ला दिलेल आहे. जी कार्यकर्ते माझ्यासाठी ईमानदारीने काम करतात, त्यांच्यासाठी मी वेळप्रसंगी जीव ही देईल, येथील जनतेनेच माझे वडील शंकरराव चव्हाण यांना व माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून साथ दिली असल्याने आपल्यातील जिव्हाळा अधिकच वाढत गेला आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झालोत, आपणच आम्हाला मोठ केले आहे हे मी कदापी विसरणार नाही. आपल्या पाठबळामुळेच भोकर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून विकासाभिमुख कामे मी करू शकलो, मी कुठेही असलो तरी माझं लक्ष मात्र हे या मतदारसंघावर नेहमी असत. विरोधकांनी कोणतीही कामे न करता मी ही कामे केली मी ती कामे केली म्हणून जनतेची दिशाभूल करतात परंतु निदान विरोधकांनी गणपतीच्या दरबारात तरी असे खोटे बोलू नये असा अप्रत्यक्ष टोला नाव न घेता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना लगावला.विकास कामे झालेल्या मतदारसंघात, आयत्यावर कोणीही येऊन राज करण्याचे स्वप्न पहात आहेत, ती त्यांची स्वप्न ही स्वप्नच राहावी यासाठी मी या निवडणुकीवर लक्ष देत आहे. आपण मतदान करत असताना विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता दिनांक 28 एप्रिल रोजी शेतकरी विकास पॅनलला हुशारीने मतदान करा त्यात आपल्याकडून चुका होऊ देऊ नका चुका होऊ न देणे हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे बाजार समितीचा बाजार करू इच्छिणाऱ्या विरोधकांना त्यांचा बाजार झाल्याचे आपल्या मतातून त्यांना निदर्शनास आणून द्या.असेही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले.
व्यासपीठावर अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केली, यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अमर राजूरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, मारोती कवळे गुरुजी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,नामदेव आयलवाड,प्रकाशराव देशमुख भोसीकर,भगवान दंडवे, बाळासाहेब पाटील रावणगावकर, जगदीश पाटील भोसीकर,विनोद पाटील चिंचाळकर, राम नाईक, गोविंद बाबा गौड पाटील, संजय कुलकर्णी, सुरेश पोकलवार, देवानंद धूत, ॲड. शिवाजी कदम,विश्वंभर पवार, रामचंद्र मुसळे, रोहिदास जाधव,सारंग मुंदडा, खाजू इनामदार,माधवराव अमृतवाड,श्याम पाटील लगळूदकर,आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मनोज गिमेकर यांनी केले तर,प्रास्ताविक जगदीश पाटील भोसीकर यांनी केले. आभार रामचंद्र मुसळे यांनी मानले.
