दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
अर्धापूर:- लोणी बु येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समतानायक थोरसमाज सुधारक महामानव क्रांती सुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची दोन्हीही गुरुमाऊलींच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून ८९२ वी जयंती साजरी केली.व त्या निमित्त महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी नियोजित जागेवर नाम फलकाचे उदघाटन/ शुभारंभ सोहळा श्री सद्गुरू तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज दत्त संस्थान पिंपळगाव व श्री.ष.ब्र.१०८ सद्गुरू युवा संत वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरलामठ वसमत या गुरुवर्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

एक ते दिड वर्षापासून लोणी बुद्रुक येथील नवयुवकांनी क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामपंचायत कार्यालय लोणी बु ला सतत पाठपुरावा केला या नवयुवक तरुणाच्या पुढाकाराला अखेर यश मिळालं. महात्मा बसवेश्वरांचे विचार तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.व महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लवकर थाटा माटात उभारणार खरच आज पर्यंत काही जणांनी बॅनर बाजी केली, काही काहीजण म्हणतात आम्ही खूप काही केलं संघटनेच्या माध्यमातून पण आजपर्यंत त्यांना बसवेश्वर महाराज यांचा पुतळा देखील बसवता आलेला नाही. पण या काही तरुणांनी करून दाखवलं त्यांना कोणत्याही संघटनेची गरज लागली नाही त्यांच्या मनात बसवेश्वरांन बद्दल प्रेम होतं आदर होता. या शुभारंभ/उदघाटन सोहळ्यास गावातील बालगोपाल,महिला, पुरुष मंडळी सर्व बसवप्रेमी उपस्थित होते.
