दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
.श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड च्या इयत्ता बारावी कला शाखेत शिकत असलेल्या प्रतीक सोनकांबळे या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले असून राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला असून त्यास कास्यपदक मिळाले आहे. या त्यांच्या क्रीडा स्पर्धेतील देशाबद्दल प्रतिक सोनकांबळे यांचा कॉलेजच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. . याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.सुधीर भाऊ गुरुनाथराव कुरुडे , शालेय समिती सदस्य मा. सूर्यकांत कावळे , उपमुख्याध्यापक डी.पी. कदम , उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे , माध्यमिकचे पर्यवेक्षक सदानंद नळगे व शिवराज पवळे , प्राथमिकचे मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले इत्यादी मान्यवरांच्या हस्ते जुडो खेळाडू प्रतीक कांबळे व क्रीडा शिक्षक प्रा.कपिल सोनकांबळे व श्री सुशील कुरुडे यांचे अभिनंदन करून कौतुक व सत्कार करण्यात आला प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक एन.व्ही.पारेकर , आर.सी.गायकवाड , प्रा.वसंत राठोड , प्रा.लुंगारे ज्ञानेश्वर , प्रा.निलेश मोरेश्वर , प्रा.अकनगिरे लक्ष्मण , प्रा.अमर दहीवडे , प्रा.शिवशंकर देशमुख , प्रा.चलवाड गंगाधर इत्यादी प्राध्यापक बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
