दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
.नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील दिग्रस बु. या गावचा एका कष्टाळु , जिद्दी , मेहनती शेतकऱ्यांचा मुलगा सतिश सोपानराव यानभुरे यांनी आटकेपार झेंडा रोवला म्हणूनच म्हणतात ना ” पुत्र जन्मावा ऐसा राजबिंडा , त्याचा तिन्ही लोकी फडकावा झेंडा.” .ग्रामीण भागातील ( सोपानराव माधवराव यानभुरे ) या एका शेतकऱ्यांचा मुलगा ज्यानी लहानपणापासून अठराविश्व दारीद्रय आणि गरीबी पाहिली होती ती घरातुन पुर्णत: घालवून देण्याचा विढाच हाती उचलून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पोर सतिश यानभुरे यानी चक्क पुण्यासारख्या महानगरात जिल्हा परिषदेचा सहशिक्षक म्हणून काम करीत असताना पुण्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. . महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघ व सम्यक शिक्षक प्रतिष्ठान , खेड तालुका, पुणे च्या वतीने संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नव्यानेच साहित्य क्षेत्रात पदार्पण केलेले सतीश यानभुरे यांचा पहिलाच कथासंग्रह ” धुळधाण ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील , बिडिओ अजय जोशी , गटशिक्षणाधिकारी जीवन कोकाणे , महाराष्ट्र कास्ट्राइब शिक्षक महासंघ राज्यअध्यक्ष गौतम कांबळे , कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद एकनाथराव चव्हाण व कास्ट्राइब संघटना सोलापूर चे सल्लागार दिगंबर काळे , इत्यादी मान्यवरांच्या हस्ते अतिशय थाटामाटात संपन्न झाला.. .महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघ व सम्यक शिक्षक प्रतिष्ठान , खेड तालुका पुणे यांनी आयोजित केलेल्या संयुक्त जयंती महोत्सव 2023 या कार्यक्रमात खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते सतीश सोपानराव यांना 2023 चा भीम रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी व्याख्याते म्हणून कैलास मुसळे सर व श्री दिगंबर काळे सर यांनी अतिशय सुंदर आपले मनोगत व्यक्त केली तसेच बालवक्ते म्हणून कुमारी शेवंती महेश कांबळे व स्नेहा विशाल डोळस यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून एक वेगळा प्रभाव पडला या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले मान्यवर मंडळी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यात जऊळके येथील लक्ष्मणराव बो-हाडे ,स्नेहा डोळस ,अशोक कडलक , गौतम कांबळे , पि.के पवार , तालुकाध्यक्ष शिनगारे सर अशोक सोनवणे , उत्कृष्ट निवेदक विशाल शिंदे सर यांच्यासह बारामती मुळशी हवेली येथून आलेले सर्व सहकारी शिक्षक बांधव व शिक्षक सर्वच संघटना मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. . सतीश यानभुरे यांच्या धुळधाण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी व भिमरत्न पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातून विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात नांदेड येथुन प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव , प्रा.यानभुरे विकास सोपानराव , कंधार येथून कुणाल अशोकराव कांबळे , सविता अशोकराव कांबळे , परभणी गंगाखेड येथुन वंदना सावंत , क-हाळे मँडम उपस्थित होते तसेच शंकरराव धोंडीबा पाटील (उपसरपंच ), सिकंदर शेख ( ता.काँ.सरचिटणीस ) , जिलानी सर , प्रा.संदिप केंद्रे सर प्रा.शिवकुमार पाटील सर , संदिप शंकरराव कांबळे ( सहशिक्षक ) , सचिन सवनेकर ( सहशिक्षक ) , विद्युत सहाय्यक महेंद्र कुमार ससाणे , राम किशन कांबळे , परमेश्वर दशरथ कांबळे , माधव संतराम कांबळे , बळीराम शेषेराव कांबळे , विनोद ससाणे , गंगाधर रावण वाघमारे , अविनाश बाबु वाघमारे , किरण उध्दव वाघमारे , भास्कर किशन वाघमारे ,सिध्दोधन दादाराव वाघमारे , जितेंद्र दशरथ कांबळे , बालाजी केरबा वाघमारे , व्यंकटी नावंदे , बालाजी भुरे , विलास गिते , राजु संभाजी कांबळे इत्यादी सह श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड च्या सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनीनी भ्रमणध्वनी द्वारे सतीश सोपानराव यानभुरे यांना धूळधाण पुस्तक प्रकाशनासाठी व भिमरत्न पुरस्काराप्राप्ती साठी शुभेच्छा दिल्या.
