
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील मौजे केरूर ता. मुखेड येथील जिल्हा परिषद शाळेला इंटरनॅशनल स्टँडर्डस ऑर्गनायझेशन (आयएसओ) नामांकन दर्जा प्राप्त झाले. असुन आयएसओचे प्रतिनिधी डाॅ.संजय कदम यांच्या हस्ते सन्मान पुर्वक मुख्याध्यापक माधव गणपती पांचाळ,यांच्याकडे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.शाळेला मिळालेल्या आयएसओ प्रमाणपत्रामुळे नवीन उर्जा प्राप्त झाली आहे.
होनवडच केंद्रांतर्गत येणाऱ्या केरूर येथील शाळा जि. प. शाळेची स्थापना1930 झाले. असून ही शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे
तसेच एकूण विद्यार्थी संख्या 218 आहे.या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी या शाळेमध्ये प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले जाते. व त्याचबरोबर कॅम्पुटर चे प्रशिक्षण देण्यात येते कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा टिकून ठेवण्यासाठी व सातत्य राखण्यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात आले होते, त्याचबरोबर या शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी, कोरोना काळात गाव बंदीसाठी सुद्धा, गावकऱ्यांना सहकार्य केल्यामुळे ही बाब विशेष ठरली.
आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण तसेच शहरी भागातील पालक तसेच विद्यार्थी यांचा कौल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत असून हे सध्याचे चित्र पाहता मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळा स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसून येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून मुखेड तालुक्यातील केरूर येथील जिल्हा परिषद हायस्कुलने आयएसओ नामांकन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल वडजे, केंद्रप्रमुख कुसुमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली केरूर शाळेचे मुख्याध्यापक माधव पांचाळ सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत नरवाडे यांच्यासह शाळेतील शिक्षक, पठाण सर, हिरामण आडे, हनुमंत चांडोळकर, तुकाराम गुंडे, शिक्षिका संगीता चिंदे मॅडम, व शालेय पोषण आहार किसन पवळे , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेची अंतर्गत तसेच बाह्य गुणवत्ता वाढवण्यासाठी अथक परिश्रम घेतल्यामुळे या कार्याची दखल घेत इंटरनॅशनल स्टँडर्डस ऑर्गनायझेशन मुंबई यांच्या वतीने शाळेचे गुणवत्ता विषयक मुल्यमापन केले.
शाळेने आवश्यक असलेली स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली त्यामुळे शाळेला प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.आयएसओ सारख्या नामांकित संस्थेकडुन जिल्हा परिषद शाळेला नामांकन प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे जि.प.शाळेकडे पहाण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलेल आणी विद्यार्थी शाळेत प्रवेश घेण्यासाठी हामखास प्रेरित होतील यात तिळ मात्र शंका नाही. केरूर जि.प.शाळेला आयएसओ नामांकन दर्जा मिळाल्याबद्दल आमदार डाॅ.तुषार राठोड, सभापती खुशाल पाटील उमरदरीकर, गटविकास अधिकारी सि.एल.रामोड, गटशिक्षण अधिकारी कैलास होणधरणे, शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठलराव वडजे, केंद्रप्रमुख कुसुमकर सर ,शिक्षक संघाचे नेते नरसिंह सोनटक्के व संबधिंत केद्राचे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.