
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- कंधार तालुक्यातील कृषी सहाय्यक ,तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक हे सज्जांच्या ठिकाणी राहत नाहीत व खेड्यामध्ये निवासांची व्यवस्था होत नसल्यामुळे ते शहरांमध्ये म्हणजेच तालुक्यांच्या ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार राहतात शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक शेतावर किंवा गावात येऊन कृषी सल्ला देत नाहीत ,शेतकऱ्यांना भेटत नाहीत ,तलाठी व ग्रामसेवक ते सुद्धा मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नाहीत या सर्व बाबीमुळे गोरगरीब जनतेस वेळोवेळी अधिकाऱ्यांना कुठे आहात केंव्हा येणार आहात केंव्हा भेटता असे प्रश्न विचारावे लागत आहेत तरी वरील सर्व बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्री साहेब यांनी प्रत्येक सज्जाच्या ठिकाणी शासनातर्फे निवासांची व्यवस्था करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जाधव व्यंकटराव, पांडुरंग कंधारे यांनी उपजिल्हाधिकारी कंधार व मा. ना. मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे मागणी केली आहे