
दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- अंजनगाव सुर्जी बहुचर्चित विवेक सुधाकर काकड यांच्या मालकीच्या दहिगाव रेच्या मार्गावर मोजा खेल कृष्णाजी शेत सर्वे नंबर २०२ एकूण क्षेत्रफळ तीन हेक्टर ९० आर पैकी ९४ आर त्यावरील संपूर्ण बांधकामासह आदेश पारित सिक्युरिटी टाझेशन कंट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अँड इन्फॉर्समेंट इंटरेस्ट २००२ चे कलम १४ नुसार अमरावती जिल्हाधिकारी यांचे आदेश दिनांक २०/०१/२०१८ यांच्या आदेशानुसार गैर अर्जदार विवेक सुधाकर काकड,अब्दुल रशीद शेख कुरेशी,मोहम्मद शफीखकुर शेख वीरहाम,सुधाकर विश्वनाथ काकड,तनवीर अहमद,अब्दुल रशीद,अझर परवेज,सौ. चंदाताई सुधाकर काकड यांच्यावर यांच्या विरुद्ध प्रकरण क्रमांक एम.आर.सी. ८१/ ४५/ २०१६/१७ या केस क्रमांकानुसार बँक ऑफ बडोदा शाखा अचलपूर प्राधिकृत अधिकारी यांच्या वरिष्ठच्या आदेशाने दहिगाव रेचा रोड,वरील कॉटन जीन फॅक्टरीला सील लावण्यात आले आहे असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रॉपर्टी धारकाकडे बँकेचे साडेपाच कोटी रुपये कर्ज होते ही प्रॉपर्टी गाहण असल्यामुळे व्याजासह बँकेचे ७ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहेत या कंपनी ने २०१३ मध्ये हे बँकेकडून कर्ज घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले सदर थकीत रक्कम १०१५ ला एन.पी.ए’त गेल्यामुळे २०१६ मध्ये वरील संचालक मंडळावर विरुद्ध हे दाखल करण्यात आली होती त्याचा जप्तीचा आदेश सन
२०१८ मध्ये पारित झाला होता.मध्यस्थी काळामध्ये कोविड असल्याकारणाने या आदेशची अंमलबजावणी झाली नव्हती अंजनगाव सुर्जी चे तहसीलदार व संबंधित मौजे येथील मंडल अधिकारी,तलाठी अंजगाव सुर्जी ठाणेदार व कर्मचारी यांच्या समस्य मंडल अधिकारी, यांना घेऊन बडोदा बँकेचे एम.डी. के.के.राऊत,अचलपूर शाखा प्रबंधक श्री दंदे यांच्या पथकाने,सर्व प्रॉपर्टी हे जप्त केली आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रॉपर्टीच्या भिंतीवर नोटीस पत्र सुद्धा चिपकवले असल्याचे दिसून आले.अंजनगाव सुर्जी येथे ही सर्वात मोठी कारवाई झाल्याने थकित कारखानदारांचे धाबे दनाणले आहेत.अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की काकड यांच्या इतरही प्रॉपर्टीवर जप्ती चे आदेश पारित झाले असल्याची त्यांनी माहिती दिली.