
दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-शहरातील अनेक नामांकित हॉटेलमध्ये खुलेआम वैश्या व्यवसाय सुरू असल्याची कुजबुज सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.यामधे अल्पवयीन शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुले-मुली असल्याचे बोलले जात असून बाहेरून येणाऱ्या कॉलगर्लचा सुद्धा वैश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
महागाईच्या जमान्यात भासलेली आर्थिक चनचन आणि श्रीमंत लोकांसारखी राहण्याची वाढलेली क्रेझ यामुळे काही मुली कॉलगर्लच्या व्यवसायाकडे वळल्या तर काही मुली प्रेमाच्या माध्यमातून आपल्या हौशी पूर्ण करून घेत आहेत.मुलींच्या या हौशी पूर्ण करत असताना मुले मात्र चोरीच्या व्यवसायाकडे वळायला लागले.यामधून मोटरसायकल चोरी,मोबाईल चोरी या तातडीच्या कमाईकडे मुले प्रामुख्याने आकर्षित झालेले आहे.ज्या मुली हॉटेलवर जातात त्यांच्यासोबत अल्पवयीन मैत्रिणी सुद्धा असतात.प्रौढ मुलीच्या वागण्याकडे बघून अल्पवयीन मुले-मुलींनचेही वाईट गोष्टीकडे आकर्षण होत आहे आणि त्यामुळे हे मुले-मुली अलगद झटपट पैसे कमावण्याच्या मार्गावर आहेत.या व्यवसायातून हॉटेल मालक मात्र दररोज लाखो रुपयांची कमाई करीत असून एका तासाला सातशे ते एक हजार रुपयाचे दर हॉटेलमध्ये असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.त्यामुळे समाजात भीती निर्माण झाली असून आई-वडिलांना ही चिंता पडली आहे की हरवून गेलेली मुलगी वैश्या व्यवसायात वाढते की प्रेम प्रकरणात वाढते त्यामुळे पालक चिंतातूर झालेले आहेत.प्रशासनासाठी ह्या बाबी रोखणे कठीण व आव्हानात्मक आहे;पण ह्या गोष्टीला आळा घालणं तितकेच जरुरी आहे.पैशासाठी हॉटेल मालक आधार कार्ड न पाहता १४ ते १५ वर्षाच्या मुलींनाही हॉटेलमध्ये प्रवेश देतात.पैशाच्या मोहापायी हे आपल्या आई-बहिणीला सोडतात की नाही हाही प्रश्न निर्माण होत आहे.याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करून शहरातील प्रत्येक हॉटेल ला वारंवार विजिट देणे जरुरी आहे.