
दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम-वसंत खडसे
💥डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बौधपौर्णीमा निमित्त ” भिमगीतांच्या” कार्यक्रमात रसिक श्रोत्यांनी दिला भरभरून प्रतिसाद.
💥 एकता ग्रुप सवड व बळीराजा मित्र मंडळ रिसोड~मालेगाव विधानसभा यांचे आयोजन.
💥 आदर्श शिंदे, पौर्णिमा कांबळे यांच्या आवाजाने रसिक श्रोत्यांना रिजवले.
वाशिम : विश्वरत्न, राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून रिसोड जवळील सवड येथे एकता ग्रुप सवड व बळीराजा मित्र मंडळ रिसोड मालेगाव विधानसभा क्षेत्र यांच्या विद्यमाने भीम गीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन काल दि.८ मे सोमवारला करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार अमित झनक व इतर मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार अमित झनक यांच्यासह पदवीधर मतदारसंघाचे आमदार धिरज लिंगाडे पाटील, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, अभिनेत्री क्रांती रेडकर, गायिका पौर्णिमा कांबळे, पॅंथर सेनेचे दीपक केदार, आयआरएस अधिकारी समीर वानखेडे, आदींची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमासाठी रिसोड मालेगाव तालुक्यासह ,संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून व शेजारच्या हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने जमलेल्या रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम स्थळ फुलून गेले होते. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायलेल्या, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर__ एक त्या रायगडावर..! एक चवदार तळ्यावर..!! या समतेचा संदेश देणाऱ्या गाण्याला उपस्थित रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून प्रतिसाद दिला. तर सुप्रसिद्ध गायिका पौर्णिमा कांबळे यांनी गायलेल्या, ” नांदन.. नांदन.. होत रमाच नांदन.. ” ..! भिमाच्या संसारी कसं टिपूर चांदण..!! या गाण्याने जमलेला अफाट जनसागर ” ” “भीममय ” झाला होता. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील नुकतेच शहीद झालेले वीर जवान पॅरा कमांडो अमोल गोरे यांच्या परिवाराला आमदार अमित झनक यांनी ” “बळीराजा ” पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाच्या शेवटी या पवित्र ” भीम गीतांच्या ” कार्यक्रमाला कुठलेही राजकीय वलय न देता रिसोड – मालेगाव विधानसभा मतदार संघाचे ” युवा आमदार अमित झनक यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.