दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम- वसंत खडसे
वाशिम : आज २५ मे रोजी झालेल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अतिशय रोमांचक व मोठी उलथापालथ पहायला मिळाली. एकूण १८ संख्याबळ असलेल्या रिसोड बाजार समितीच्या संचालक पदाची सार्वत्रिक निवडणुक अटीतटीची झाली होती. सदर निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख प्रणित भाजप व मित्रपक्षाच्या युतीकडे १० सदस्यांचे संख्याबळ होते, मात्र ऐनवेळी मा.खा. अनंतराव देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले संजय शिंदे हे आ. अमित झनक यांच्या नेतृत्वात काँगेस मधे प्रवेश घेऊन महविकस आघाडीत सामील झाले. परिणामी बाजार समितीच्या बहुमतासाठी दोन्ही गटाचे ९/९ असे समांतर संख्याबळ झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक ईश्वरचिठ्ठी पद्धतीने घ्यावी लागली. सदर रोमांचक निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीचा कौल महाविकस आघाडीच्या बाजूने मिळाला. आणि सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे महाविकास आघाडीच्या पदरात पडून अखेर बाजार समितीवर महाविकास आघाडीचा जय हो झाला.
सदर निवडणुकीत महाविकास आघाडीला नशीब लाभले. ईश्वर चिठ्ठी ने झालेल्या या निवडणुकीत दोन्ही पदे महाविकास आघाडीच्या पदरात पडली. आज स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्याआधी भाजपचे अनंतराव देशमुख गटाचे संजय शिंदे शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीत दाखल झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना सभापती पदाची ऑफर दिली, ती त्यांनी स्वीकारली. सदर निवडणूक प्रक्रिया हात वर करून पार पडली, ९/९ सदस्यांनी दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दर्शवल्यानंतर अखेर ही निवडणूक ईश्वर चिठ्ठीने घेण्यात आली. यामध्ये सभापती पदासाठी भाजपचे शामराव उगले यांचा महाविकास आगडीचे संजय शिंदे यांनी पराभव केला. त्यानंतर उपसभापतिपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राजाराम आरू यांनी सेनेच्या शिंदे गटाचे गजानन आवताडे यांचा पराभव केला. विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी आमदार अमित झनक यांच्या रिसोड येथील जनसंपर्क कार्यालया समोर आतिष बाजी करून आनंद साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार साहबराव नप्ते यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.सहाय्यक बनसोडे यांच्यासह मोरे यांनी सहकार्य केले.


