
दैनिक चालू वार्ता रिसोड तालुका प्रतिनिधी -आत्माराम जाधव
रिसोड :- नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यू पी एस सी चा निकाल लागला आहे. या परीक्षेत पुसद चे डॉ. सुमेध मिलिंद जाधव यांनी यश मिळवलं आहे.
समता नगर पुसद येथील रहिवाशी असलेले प्राचार्य श्री. मिलिंद जाधव सर यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. देशात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षेत डॉ.सुमेध जाधव यांनी यश संपादन केल्या बद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुमेध जाधव यांचे मूळ गाव तालुक्यातील बोरी मुखरे आहे. त्यांच्या यशाने पुसद तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांचे वडील गौळ बु. जे एस पी एम विद्यालयामध्ये मुख्याध्यापक आहेत. तर, आई पौर्णिमा मिलिंद जाधव ह्या खडक दरी येथील सू ना विद्यालयात शिक्षिका आहेत. सुमेध जाधव यांचे प्राथमिक शिक्षण पुसद येथील माईसाहेब मूखरे प्राथमिक मराठी शाळेत झाले. तर, माध्यमिक शिक्षण कौ दो महाविद्यालयात झाले. दहावीत त्यांनी ९६.३६ गुण मिळवले. तर, उच्च माध्यमिक शिक्षण येथील शिवाजी ज्युनियर कॉलेज मध्ये झाले. १२ मध्ये त्यांना ८६% इतके गुण मिळाले होते.
लहानपणापासून अभ्यासाची आवड असलेल्या सुमेध जाधव यांनी नीट परीक्षेत १७ वा क्रमांक पटकावला.त्या नंतर मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेज जे जे रुग्णालयात त्यांनी एम बी बी एस शिक्षण पूर्ण केले. काही दिवसापूर्वी नाशिक ते मुंबई शेतकरी मोर्चा निघाला होता.तेव्हा जखमी पायांवर सुमेध यांनी उपचार केले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज मध्ये ते अतिशय तत्परतेने काम करतात. तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर ला येणाऱ्या अनुयायांनी मोफत वैद्यकीय सेवा करतात. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच आपले आई वडील आणि गुरुजन यांना दिले.