
दैनिक चालु वार्ता कौठा ता.कंधार प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
कौठा येथील कै.शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेचा 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून या महाविद्यालयाने मागील बारा वर्षापासून कौठा पॅटर्नच्या शैक्षणिक विकासामध्ये भर घालण्याचे कार्य केले आहे. ई.12 वी एप्रील/मे 2023 च्या बोर्ड परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातून एकुण १४१ विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते त्यातील विज्ञान शाखेतुन १०१विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. . कला शाखेतून ४०पैकी ३६विद्यथी उत्तीर्ण झाले आहेत . विज्ञान शाखेतून पोकरणे संजना राजु ८५% प्रथम .बिडवे व्यंकटेश माधव ७६%दि्तीय.ओमकार काकडे
तृतीय .कला शाखेतून टोकलवाड भक्ती यादव प्रथम .आयशा चांद शेख द्वितीय
हराळे गंगाधर रामदास तृतीय
या यशाबद्दल संस्थेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकाचे अभिनंदन संस्थेचे सचिव शिवकुमार देशमुख.अध्यक्षा श्रीमती राजकुमारी शिवराज देशमुख.कोषाध्यक्षा सौ अर्चनाताई शिवकुमार देशमुख यांनी केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य धुमाळे एस एम.नकाते सर ,पांडागळे मॅडम,राठोड सर,येवतीकर सर,पाटील मॅडम,शिंदे सर.पालिमकर, वाघमारे,भुजंग देशमुख हे सर्व कर्मचारी उपस्थित होते