
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळ लातूर अंतर्गत घेण्यात आलेल्या एच एस सी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2023 मध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कला , वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल सरासरी 88.76% लागला आहे व एम. सी व्ही सी चा सरासरी 84.9% निकाल लागला आहे.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाची यशस्वी परंपरा कायम ठेवत याही वर्षी निकालात विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यावर्षी एकूण तिन्ही शाखेतून 534 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 474 विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला शाखेतून चि. बोरगे धनंजय हनुमंत 80.83%, द्वितीय कु. शिंदे कांचन सुनील 78.50%, तृतीय कु. कांबळे शिवसंध्या चंद्रकांत ७८.१७ टक्के वाणिज्य शाखेतून प्रथम कु. कोल्हे सानिका रामदास 86.67% द्वितीय कु. कवडे कल्याणी राजाभाऊ 82.50% तृतीय कु. लांडगे अस्मिता संजय 74.67% विज्ञान शाखेतून प्रथम कु. खापे किरण भगवानराव 79.00% द्वितीय चि. कोकाटे संकेत सतीशराव ७८.१७% तृतीय चि.पोटे श्रीकृष्ण महेश 77.36% गुण घेऊन यशस्वी झाले व तसेच एमसीव्हीसी शाखेतून हॉर्टिकल्चर ट्रेड मधून प्रथम कु. देशमुख मयुरी त्रिंबक 63.50% इलेक्ट्रॉनिक ट्रेड मधून चि.क्षीरसागर तेजस मधुकर 58.67% ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मधून चि.वाघमारे प्रथमेश अमोल 54.50% गुण घेऊन उत्तीर्ण झाले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.पवार पी.एस.,पर्यवेक्षक श्री.टेकाळे एन.जे. व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.