दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम- दिनकर गडदे
वाशिम . राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान 2023, 24 अंतर्गत विविध क्षमता बांधणी उपक्रमाची अंमलबजावणी राज्य ग्रामीण विकास संस्था. यशदा मार्फत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी संत गाडगेबाबा विद्यापीठ रोड अमरावती येथे दोन दिवशीय सरपंच प्रशिक्षणासाठी प्रशिक्षिकांचा उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती.
मौजे टनका येथील सरपंच शरद गोदारा. कार्यक्रमाला उपस्थित असता त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.व गाव स्तरावरून त्यांच्या कामाचा व त्यांचा गावकऱ्यांकडून . त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे


