
दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
दि. २४ मे (कल्याणी नगर पुणे)
निसर्गरम्य परिसरात भारतीय दलित कोब्रा ॲड वनिता चव्हाण वसाहतच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या बुद्ध वाटिकेच्या कामाचा शुभारंभ पुणे शहर पोलीस सहआयुक्त मा संदीप कर्णिक साहेब यांच्या हस्ते करण्यात आला वंदनीय भंते झेन मास्टर सुदर्शन यांनी बुद्धमूर्तीची धार्मिक विधीनुसार स्थापना केली.
माहिती अधिकार आयोग महाराष्ट्र राज्य सचिव लक्ष्मण गायकवाड साहेब येरवडा मा मिलिंद गायकवाड, सुरेश डेकाटे देवकर पाटील सदर प्रसंगी उपस्थित होते सध्या पुणे शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या शरीरावर व मनावर विपरीत परिणाम होत आहे पर्यावरण समृद्धी व्हावा व तणाव रहित जीवन नागरिकांनी जगावे यासाठी बुद्ध वाटकेची उभारणी करण्यात येत आहे बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जो पुढाकार घेतला त्यासाठी संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यात आला.
सदर बुद्ध वाटिका मा वंदनीय भंते झेन मास्टर सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.