
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
उद्या शुक्रवार, दि. २६ मे २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाग घेणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते विविध कामाविषयीचा आढावा घेणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्याला स्थानिक व हक्काचे पालकमंत्री नसल्याची टीका सातत्याने केली गेली नसती. त्याचाच परिपाक म्हणून नागरी व सर्वांगीण विकासाकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत असल्याची टीका सर्वच राजकीय स्तरातून केली गेल्यास आश्चर्य वाटू नये. पालक मंत्री स्थानिक असोत वा परक्या जिल्ह्यातील, परंतु त्यांचे संबंधित जिल्ह्याकडे कटाक्षाने लक्ष असणे अधिक गरजेचे ठरते. प्रलंबित नागरी विकासाच्या योजना मार्गी लावण्यासाठी उदासीनते ऐवजी तत्परता दाखवली गेली तर आणि तरच नियोजित योजना साध्य होऊ शकतील अन्यथा पालक मंत्र्यांची धुरा सोपवूनही विकासापासून कोसो दूर राहाणारा परभणी जिल्हा परक्या पालक मंत्र्यांमुळे अखेर तो पोरकाच बनला जाईल, असं म्हणायला कोणालाही वाव मिळू नये. तसं जर झालं तर मात्र ‘जगात जर्मनी आणि भारतात परभणी’ प्रचलित ठरली जाणारी निजामकालीन जिल्हा भूमी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षकाळातही विकासासाठी अद्याप वंचित आहे, उपेक्षितही आहे, असं जर कोणी म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही, एवढं मात्र खरे. तद्वतच पालकमंत्री परका असला तरी नमूद जिल्हा विकासापासून पोरका होता कामा नये, यांचे भान संबंधित मंत्री महोदय आणि सरकारला निश्चितच असणे आवश्यक आहे.