
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर : परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज जागतिक योग दिन बलोपासक मंडळातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व श्री.गुरुजीच्या पुजनाने झाली. कार्यक्रमासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया देगलूरचे कॅशियर कपिल महिन्द्कर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साठी आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अष्टांग मार्गा बद्दल सविस्तर मार्गदर्शन करुन प्रत्यक्षात योगासने, प्राणायाम विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून करुन घेतले. कार्यक्रमासाठी माध्यमिक विदयालयात मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दमण देगावकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती अर्चना सुरशेटवार यांनी केले. तर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते…