
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. गेले तीन दिवस हा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यामध्ये असून आज हा पालखी सोहळा इंदापूर वरून सराटी येथे मुक्कामी जात असताना शेटफळ पाटी येथे शेटफळ हवेली (तळेवाडी) येथील मुस्लिम समाज बांधव तसेच मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने वारकऱ्यांना मोफत शिरखुर्मा तसेच बेसन भाकरीचे वाटप करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांनीही आनंदाने शिरखुर्मा व बेसन भाकरीचा आस्वाद घेतला.आणि एक हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन शेटफळ पाटी येथे पहावयास मिळाले.
यावेळी मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटना संस्थापक अध्यक्ष मुख्तार (साहेब)मुलाणी, सर्व पदाधिकारी बनशिद मुलाणी, जावेद मुलाणी, सलमान मुलाणी, शफीक मुलाणी,अनिसभाई शेख, शाहरुख मुलाणी,फिरोज मुलाणी ,अजिज शेख अब्दुल मुलाणी,अफसर मुलाणी, साहिल मुलाणी तसेच समाजबांधव मोठ्या उपस्थित होते.