
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:23 जून 2023 रोजी देगलुर जुने बसस्टँड व पोलिस कॉर्टर हद्दीलगत पुर्व बाजु व शिवबा , नगर च्या पश्चिम बाजु दोघा मधे रामपुर पानंद रस्ता आहे जो जि. प. बांधकाम विभागाचा चाळीस फुटाचा ग्रामिण मार्ग क्रमांक 29 आहे. 2022 जुन मधे दोन्ही बाजुने नाली काढायची सुचना नगर पालिकेने दिली . उदगीर रोड पासुन रामपुर रोड वर सुरुवातीला अतिक्रमण आहे त्या पुढील उरलेल्या जागेवर रोड केला आहे . अतिक्रमण हटऊन त्या जागेसह बस स्टँड पोलिस क्वार्टर च्या हद्दी पासुन पुर्वी कडे चाळीस फुट रोड निश्चित करून नालि करा . अतिक्रमनामुळे रोड छोटा होउन पूर्वेस शिवबा नगर कडे सरकला व या रोड च्या मध्य भागातून मोजले तर शिवबा नगर कडील काबीज, अधिक्रुत मालमत्ता धारकांच्या जागेत रोड सरकुन नाली घुसते असे दिसुन येते म्हणुन डॉ. सुनील जाधव सह , रमेश अमृतवार , विशाल व ओंकार अमृतवार, हणमंत श्रीरामावार , पुजलवार रामराव , डॉ. अभि गउळकर ,डॉ. अश्विनी गउळकर डॉ. श्याम कळसकर , राजेश कळसकर , बाबुराव वलेपवार , सतीश जाधव , पांडुरंग दाचावार , श्रीनिवास नाईक या मालमत्ता धारकांनी संबंधित नगर पालिका , जिल्हा परिषद बांधकाम विभाग , उपजिल्हा अधिकारी देगलुर , जिल्हाधिकारी नांदेड़ सह संबंधीत प्रशासनास वारंवार वैयक्तिक व सामूहिक निवेदन दिले . चुकीच्या ठिकाणी नाली होऊ नये निधी वाया जाऊ नये म्हणुन पाठ पुरावा केला . पण अतिक्रमण हटुन बसस्टँड हद्दी लगत नाली होण्या ऐवजी मध्य भागी डीव्हायडर यावे तिथे नालि झाली . निवेदनावर कार्यवाही झाली नाही .अतिक्रमनामुळे रोड छोटा होउन महिला , विद्यार्थी ,रूग्ण , नागरीक यांना भयंकर वाहतुक खोळंबा , त्रास होत आहे या वर्षी जुन 2023 मधे रोडच्या पूर्वेकडील नालि बांधकाम चालु केले आहे व बस स्टँड , पोलिस क्वार्टर हद्दी पासुन चाळीस फुटावर नाली करणे क्रमप्राप्त आहे . पण शिवबा नगर कडे रोड सरकल्या मुळे शिवबा नगर कडील काबीज , अधिकृत मालमत्ता धारकांच्या जागेपासुन दुर नालि होण्याऐवजी त्यांच्या जागेत घुसत असल्याचे दिसुन येते . करिता 22 व 23 जुन 2023 ला पुन्हा डॉ. सुनील जाधव यांनी पुर्वी दिलेले निवेदन , उपलब्ध कागदपत्र जोडुन रोड च्या पूर्वेकडील, शिवबा नगर बाजुच्या मालमत्ता धारकांच्या काबीज , अधिकृत जागेत नालि काढु नये त्यांची जागा सोडुन पुढे नालि काढावी बस स्टँड , पोलिस क्वार्टर हद्दी पासुन पुढे चाळीस फुट रोड आहे तिथे नालि काढणे क्रमप्राप्त आहे . जेणेकरून अतिक्रमनाची झळ काबीज अधिकृत लोकांना बसुन त्यांच्या काबीज मालकी जागेत नालि होउन अतिक्रमण होणार नाही त्यांच्यावर अन्याय होउन अनिष्ट बाबी उद्भवनार नाहीत याची जबाबदारी संबंधीत प्रशासनावर राहील असे निवेदन दिले या वेळी डॉ. सुनील जाधव ,सतीश जाधव ,वैशाली सागावे जाधव यांच्या सह संभाजी ब्रिगेड्चे तालुकाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे, संभाजी ब्रिगेड उप शहर अध्यक्ष डॉ. सुनील जाधव , कॉग्रेस तालुका उपाध्यक्ष भरत पाटील , युवा सेना तालुकाध्यक्ष संतोष पाटील भुतनीहिप्परगेकर , देगलुर बिलोली मतदार संघ बी. आर. एस. पार्टी समन्वयक रमेश घुळेंकर आदी नी सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम , मुख्याधिकारी सुंदर बोन्दर , उपअभियंता जि.प. बांधकाम विभाग देगलुर यांना निवेदन दिले . अतिक्रमणमुक्त विकासनशील देगलुर साठी सर्व पक्ष , संघटना पदाधिकारी , अधिकारी , नागरीक , कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा असे नम्र आवाहन मी डॉ. सुनील जाधव यांनी सांगितले आहे.