
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून गेली २२ वर्षे जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा वारीमध्ये मोफत आरोग्य सेवा केली जात आहे. पुणे ब्रांच या पथकाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया मोफत आरोग्य सेवा वारीमध्ये या मेडिकल कॅम्पला भेट दिली. आणि स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठे नावलौकिक आहे, असं ते म्हणाले.
यावेळी सोबत उपस्थित सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया चे प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू, पथक प्रमुख जयसिंगराव पवार, रिटायर डेप्युटी डायरेक्टर डॉ. दत्ता खुणे तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.