
दै चालु वार्ता परंडा प्रतिनिधी
धनंजय गोफणे
परंडा -तालुक्यातील सोनारी येथील जि.प.प्र.माध्यामीक शाळेला गणित व विज्ञान या महत्त्वाच्या विषयाचे गेल्या वर्षभरापासून शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांनसह ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असुन दि ७ जुलै पर्यंत शिक्षक मिळावा अन्यथा संपूर्ण शाळेला टाळा ठोकण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
सन २०२३- २४ चे शैक्षणिक वर्ष चालु होऊन प्रथम सत्र झाले आहे. ९ वी व १० वी साठी गणित व विज्ञान विषयांचे शिक्षक गेल्या वर्षी भरापासून शिक्षकच नाही.
मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकार्यांना वारंवार लेखी व तोंडी व भ्रमणध्वनी वरून कळवून देखील शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक चांगलेच संतापले आहेत. दि. २७ जून रोजी जि.प.शाळेत तातडीची शालेय व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली यावेळी रिक्त शिक्षकांच्या मुद्यावर संतप्त पालक व ग्रामस्थांनी मुख्याध्यापक यांना धारेवर धरले होते. तर ७ जुलै पर्यंत गणित व विज्ञान विषयांचे शिक्षक यांची कायम स्वरूपी पद भरती न झाल्यास शाळेला ताळे ठोकण्याचा इशारा या बैठकी दरम्यान घेण्यात आला आहे. तसे लेखी निवेदन देखील मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, तहसील व पोलीस स्टेशन ला देण्यात आले आहे. यावेळी शालेय समिती चे अध्यक्ष परमेश्वर जगताप, उपाध्यक्ष दिपक सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य अंगद फरतडे, रामकृष्ण पाटील, रवि मांडवे, सचिन पवार, धोंडीराम पाटील, आबा हांगे, महादेव सांगडे, राहुल मोरे, शिवशंकर क्षिरसागर,जालिंदर मुरकुटे, यांच्या सह ५२ ग्रामस्थ व महिला पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.