
दै.चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी मन्मथ भुस्से
अर्धापूर देळुब :- दिव्यांग बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीसांनी योग्य तपास करावा अशा सुचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिल्या व सबंधित अधिका-यांनी अटल योजनेतून पिडीत कुटुंबीयांना तात्काळ घर मंजूर करून द्यावे अशा सुचना प्रशासनास विरोधी पक्षनेते दानवे यांनी पिडीत कुटुंबीयांशी बोलतांना दिल्या आहेत.
अर्धापूर तालुक्यातील देळुब बु. येथील पिडीत कुटुंबीयांची घरी जाऊन भेट देऊन धिर दिला आम्ही तुम्हच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्या नराधमास कठोर शिक्षा होईल यासाठी पोलीसांनी योग्य दिशेने तपास करावा अशा सुचना दिल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली जिल्हाप्रमुख विनायक भिसे
महेश खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आपल्या कुटुंबीयां सोबत असुन कुटुंबीयांना जे मदत लागेल ते करण्यासाठी जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी पिडीत कुटुंबीयांशी संपर्कात राहावे अशा सुचना दिल्या आहेत. तर आरोपींना कठोर शिक्षा होईल असे आश्वासन गावकऱ्यांना दिले व पिडीत कुटुंबीयांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आर्थिक मदत केली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव, गटविकास अधिकारी मिना रावताळे,
नायब तहसीलदार शिवाजीराव जाधव, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, मंडळ अधिकारी जयश्री कोल्हे, तलाठी उज्वला वानखेडे, विस्तार अधिकारी विश्वनाथ मुंडकर, पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड, जमादार बालाजी चाटे, पप्पू चव्हाण, तालुकाप्रमुख पिंटू वासरीकर, सरपंच अजमतखान पठाण, उपसरपंच अनिल थोरात, पिंटू सुंन्पे, उपसभापती अशोक कपाटे, शहरप्रमुख काजी सल्लावोद्दीन, शेतकरी तालुकाप्रमुख
रमेश क्षीरसागर, उपतालुका प्रमुख अशोक डांगे, सुनील बोबडे, गजानन गव्हाणे,
सोशल मियडाचे शेख रफिक यांच्या सह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते…