
गुणवंत विद्यार्थ्यांचा शर्करा तुला..
दै.चालू वार्ता नांदेड प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव..
नांदेड – श्री शिवाजी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर , नवीन कौठा नांदेड येथे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक – संचालक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार तथा आमदार शिक्षण महर्षी शिक्षण ,भगीरथ , सुग्या मुग्याचे कैवारी दिवंगत भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या 102 व्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले तसेच मातोश्री मुक्ताई व मुक्ताईसुत दिवंगत डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. .या जयंती स्मारंभ कार्यक्रमांमध्ये दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या व जेईई , नीट , सीईटी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शर्करातुला करण्यात आली. तसेच जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले त्यात प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक मिळवला त्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व शाल , पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त केले मनोगतामध्ये मुक्ताईसुत डॉक्टर भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या 102 वर्षाच्या जीवन प्रवासावर व चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला त्यांची सामाजिक , शैक्षणिक व राजकीय वाटचाल कशी होती आणि त्यासाठी त्यांनी कोणते व काय प्रयत्न केले यावर मत मतांतरे मान्यवरांनी मांडले.मुक्ताईसुत डॉक्टर भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कौठा येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले हा वृक्षारोपण कार्यक्रम सुद्धा अतिशय दिमागदार पद्धतीने पार पडला यासाठी प्रा.श्रीवास्तव दीपक प्रा.ज्ञानेश्वर लुंगारे , प्रा.शिवशंकर देशमुख प्रा.योगेश दिग्रसकर प्रा.स्वामी संगीता प्रा.दिपाली जामकर यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी मेहनत घेतली. .दिवंगत डॉक्टर भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या जयंती कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव माननीय गुरुनाथ राव कुरुडे साहेब उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून थोर साहित्यिक माननीय देविदास फुलारी साहेब व कवी मुंडे साहेब यांच्यासह संस्थेचे सदस्य माननीय प्रा. वैजनाथराव कुरुडे साहेब, शालेय समिती सदस्य माननीय सूर्यकांत कावळे मा.एम.पी.कुरुडे , इंद्रजीत बुरपल्ले , मुख्याध्यापक सुधीर कोरडे उप मुख्याध्यापक डीपी कदम उपप्राचार्य डॉ. एम.एन. शिंदे , माध्यमिकचे पर्यवेक्षक श्री सदानंद नळगे व शिवराज पवळे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे , शहाजी आहेर , सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोधने सर ,रुमाले सर ,पंडित भुरे सर , परशु अण्णा, कौठा इन्चार्ज सय्यद जमील , सेवा निवृत्त क्लार्क निरपणे सर , इत्यादी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ.स्वाती कान्हेगावकर तसेच डॉक्टर तीर्थे मॅडम व सुवर्ण कळसे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणानंतर प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांनी ढोल ताशाच्या ध्वनीवर अर्थातच संगीतमय तालासुरा वर राष्ट्रगीताने केली याप्रसंगी या कार्यक्रमास श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पहिली ते बारावीपर्यंतची विद्यार्थी संख्या व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.