
दै.चालु वार्ता
उस्माननगर (प्रतिनिधी
लक्ष्मण कांबळे
नांदेड उस्माननगर :- तालुका कृषी अधिकारी कंधार आयोजित कृषी संजीवनी सप्ताह निमित्त उस्मान नगर येथील कृषी सहाय्यक सोपान उबाळे यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे शेतकऱ्यांना विविध विषयाचे मार्गदर्शन करून कृषी संजीवनी सप्ताह उत्साहात संपन्न करण्यात आला.
यावेळी बियाणे उगवण क्षमता तपासणी , बीज प्रक्रिया करणे , शंकी गोगलगाय नियंत्रण , गोगलगायीचे नियंत्रण , तुर पिकावरील कीड व रोग नियंत्रण , कपाशीवरील कीड व रोग नियंत्रण , आपत्कालीन पीक व्यवस्थापन नियोजन याबाबत मार्गदर्शन केले सध्या उशिरापर्यंत सुरू न झालेल्या पावसाबाबत पेरणी करताना घ्यावयाची काळजी आणि शिते १०० टक्के मिली लिटर पूर्णपणे पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये ,आधुनिक तंत्रनाचा वापर करून बीबीएफ सारखे यंत्र वापरून तसेच गादीवाफ्यावर पेरणी करावी अशी इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकरी बाबूराव पाटील घोरबांड ,प्रदीप देशमुख , ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे , बालाजी सुर्यवाड , तुकाराम भिसे ,कल्याण सोनसळे , यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..