
दै.चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा, शाम पुणेकर
पुणे : स्मगलिंगसाठी महिला काय करतील याचा नेम नाही. एक धक्कादायक प्रकार काल पुणे विमानतळावर उघडकीस आला. १ जुलै रोजी दुबई हून आलेले स्पाईसजेट विमानातून एक महिला पुणे विमानतळावर उतरली. ह्या महिला प्रवाशाने वीस लाख किंमत असणारी सोन्याची पेस्टची कॅप्सूल्स आपल्या गुप्तांगात लपवून आणल्याची घटना उघडकीस आली. कस्टम्स ने एका महिलेस अटक करून तीच्या विरूद्ध सीमाशुल्क कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला स्पाईसजेट एसजी-५२ विमानातून उतरली आणि ग्रीन चॅनल ओलांडून गडबडीत विमानतळावरून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात होती,
तेवढ्यात संशय आल्याने विमान अधिकाऱ्यांनी तीला चपळाईने पकडले. महिला अधिकाऱ्याने तीच्या तपासणीसाठी तीला रुग्णालयात नेले. तेथे एक्स रे तपासणी केली असता तीने शरीराच्या ‘त्या’ जागेत सोन्याचे दोन पांढ-या कॅप्सूल्स लपविलेले आढळून आले. ४२३ ग्रॅमचे सोने (पावडर) तीच्या शरीरातून बाहेर काढले आणि जप्त केले. त्याची किंमत सुमारे २० लाख रूपये आहे. पुढील तपास चालू आहे.