
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
विद्यार्थी शिक्षण घेतात पडक्या छताच्या खाली…!
देगलूर:हाणेगाव येथील जि.प.हायस्कुल शाळेची इमारत पुर्णतः मोडकडीस आली असुन आज शाळेतील विद्यार्थी पडक्या छताखाली बसुन शीक्षणाचे पाठ घेताना दिसतात.
पावसाळ्यात शाळेच्या समोर आणि आत पाण्याचे डबके साचुन दुर्गंधी व मच्छरांचा प्रार्दुभाव वाढला असल्याचे चित्र दिसत आहे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर व्यवस्थीत छत नाही आणि खाली बसायला जागा निट नाही अशा अवस्थेतुन आनेक संकटाचा सामना करत चिमुकले विद्यार्थी शिक्षणाचे पाठ घेताना बघायला मिळते आहे. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या बऱ्यापैकी असुन शिक्षकांची संख्या कमीच आहे शाळेत पावसाळ्याच्या पाण्यामुळे वर्ग खोल्यांची वरील छत पुर्णतः कुजुन आत मधील गजाळी बाहेर पडली आहे कधी छत खाली पडेल सांगता येत नाही विद्यार्थी तर खालेच बसुन शिक्षण घेतात जर काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार शिक्षण विभाग राहणार का? हा प्रश्न नागरीकांना पडला आहे तर एकीकडे शाळेच्या परीसरात काटेरी झुडपे वाढल्यामुळे विंचु किड्याचा ही वावर वाढला असुन आनेक विद्यार्थी याच मैदानात क्रीडा विषयक खेळ खेळत असतात बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोन ? हा प्रश्न पालकांना पडला आहे म्हणुन परीसरातील झाडे छुडपे साफ करण्याची गरज आहे शाळेला रंगरंगोटी करण्याचीही गरज आहे.
शासन सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत लाखो रुपये खर्च करतो पण हे खर्च कुठ खर्च होतो हेच कळेना एकेकाळी तालुक्यात नाव गाजलेली जि.प.हायस्कुल शाळेला आज या शिक्षण विभागाच्या दुर्लक्ष कारभारामुळे शाळेला उतरती कळा आलेली पाहायला मिळते आहे .सध्या शिक्षणाचं बाजारीकरण झाला असुन शिक्षण गरीबांना परवडणारं राहीला नाही श्रीमंतांचे मुलं खाजगी शाळेत आणि गरीबांचे मुले जि.परीषद शाळेत याच्यातुन काय होतो श्रीमंताचा मुलगा कलेक्टर आणि गरीबाचा मुलगा मजुरकार म्हणुन गरीबांचं विद्येच मंदीर म्हणजेच जि.प.हायस्कुल शाळा हेच विद्यार्थी व पालकांचा आशेचं किरण आहे. जर शिक्षण विभाग व स्थानीक ग्रामपंचायत या शाळेकडे गांभिर्याने लक्ष दिल्यास शाळेतील विद्यार्थ्यांचा भविष्य सुधारेल यात शंका नाही.मागील काळात याच शाळेतुन आनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत या शाळेला एक वेगळा इतीहास आहे. या शाळेच्या विकासाच्या बाबतीत सतत आनेक वेळेस वेगळ्या वृत्तपत्रांतून बातम्या प्रकाशीत करुन सुद्धा याची दखल संबंधीत शिक्षण विभाग व स्थानीक ग्रामपंचायत घेत नाही. यामुळे शिक्षणप्रेमी सुशिक्षीत नागरीक पालकांत नाराजगी वाढली असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट- मुख्याध्यापक संदेश आमगे: आम्ही गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊ विद्यार्थांना ही जबाबदारी आम्हची पण आम्हाला शाळेत लागणारं भौतीक सुविधा उपलब्ध करुन द्यावं हीच संबंधीत शिक्षण विभाग व ग्रामपंचायतला विनंती…